Sunday 16 September, 2012

माणसं

 अनिल अवचटांचा माणसं नावाचा एक लेख संग्रह आहे. त्यांची क्षमा मागून.

बोहनी

श्रीलंकन एअरलाईन्सचं विमान पॅरिसला पोचलं आणि CDG Protocol प्रमाणे, मला सागळं आवरून टर्मिनल १ वरून २-ई ला जायचं होत.  सीमा-पोलिस, immigration ला तिथे border-police असा शब्द अाहे, कस्टमनंतर, मी बॅग घ्यायला गेलो. तिथे नेहमीप्रमाणे बॅगा पट्टयावर फिरत होत्या आणि नविन बॅगा येत होत्या. लोकं आपआपल्या बॅगा घेत होते. थोड्या वेळाने नविन बॅगा येणं थांबलं, १-२ बॅगा अजून पट्टयावर फिरत होत्या. २०-२५ लोकं अजून बॅगा यायची वाट बघत होती, अस्मादिकही त्यामधलेच एक. आणि मग ई-फलकावर संदेश आला, श्रीलंकन एअरलाईन्सचं आवरलंय आता थाई एअरचं सामान येईल. मी मनात म्हटलं, बोहनी तर छान झाली. बॅग हरवणं, ते पण जाताना पहिल्याच दिवशी आणि पॅरिसला. त्या २०-२५ जणांमध्ये, ७-८ गोरे, ३-४ काळे आणि बाकी सावळे. पुन्हा एकदा गर्दीच्या आधाराची मला जाणीव झाली. एका जरा वयस्कर गोऱ्या बाईने तिथल्या अधिकाऱ्याला काहितरी विचारलं, त्याने काहितरी उत्तर दिलं. मी सवयीप्रमाणे ते फ्रेंच संभाषण ऐकायचा प्रयत्न केला, तो निष्फळ ठरला. मग एक बहुतेक, भारतिय किंवा श्रीलंकन सेवानिवृत्त शासकिय अधिकारी, पुढे आले. त्यांनी एकदम शुद्ध ईंग्रजीमधे अधिकाऱ्याशी बोलणं केलं. त्यातून समजलं की, की कोणालाही इथे काहिही माहिती नाही. फक्त इतकी लोकं आहेत म्हणजे काहितरी गोंधळ आहे, असं त्या फ्रेंच अधिकाऱ्याला वाटतयं. मग त्या अधिकाऱ्याने १५-२० मिनिटे फोनाफोनी केल्यवर, सामान पॅरिसला आलयं, त्या ट्रॉलीमधला एक डब्बा उघडायचा राहिला, आता तो उघडलाय, सामान येईल, हे समजलं. भले शाब्बास!
त्या प्रमाणे १०-१५ मिनीटांमध्ये बॅग आली.  मग मी CDG Protocol ची प्रत बाहेर काढली आणि निघालो.

गूगलकन्या
मी CDG Protocol नुसार, टर्मिनल १ वरून २-ई ला जायची शटल शोधत होतो. तेव्हा एका मुलीने माझं लक्ष वेधून घेतलं. ती भारतिय लोकांमध्ये चिंकी आणि अमेरिकी लोकांमध्ये एशियन प्रकारांत मोडत होती. पण तिने गूगलचा टी-शर्ट घातला होता. तेव्हा वंशवादी शब्द वापरण्यापेक्षा, मी तिला गूगलकन्या म्हणतो.
मी आणि ती, म्हणजे वेगवेगळे, टर्मिनल १च्या शटलच्या फलाटाकडे जाणाऱ्या दरवाजापाशी आलो. दरवाजातून आलेल्या शटलमधील माणसं टर्मिनल १ ला येत होती. त्या माणसांमधून एक मुलगा घाईघाईने आला आणि त्याने गूगलकन्येला मिठी मारली. अर्थातच तो तिचा भाऊ असणार याविषयी, माझ्या मनात शंका नाही.  मग तिने तक्रारीच्या सूरांत, ईतका ऊशीर का झाला ते विचारलं. त्याने, "I grossly underestimated the shuttle time." यावर गूगलकन्येने, "How could you?" असा प्रश्न केला. गूगलचा टी-शर्ट घातला म्हणून बिनडोक प्रश्न विचारू नयेत असं थोडंच!
 CDG Protocolच महत्त्व लगेच मला जाणवलं.

स्विस माणसं
फ्रांस, स्वित्झर्लंड, अॉस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, जर्मनी या पाचही देशांमध्ये स्विस लोकं आम्हाला सर्वात जास्त आवडली. सगळी स्विस मंडळी  मदतीला एकदम तत्पर. स्वत: थोडा त्रास सहन करूनसुद्धा ते तुम्हाला मदत करतात.
सुरूवातच आमची पोलिसापासून झाली. गाडी फ्रांसची हद्द ओलांडून, आधी जर्मनीत नंतर स्वित्झर्लंडमध्ये शिरली.
आतापर्यंत कविनने टोल नसणारा रस्ता शोधला होता. पण स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश करताच पोलिस चेकपोस्ट लागलं. स्वित्झर्लंड शेंगेन करारामध्ये सहभागी आहे, पण युरोझोन आणि युरोपियन युनियनमध्ये सहभागी नाही. त्यामुळे बहुतेक थोडी तपासणी करत असावेत. पोलिसाने प्रथम पासपोर्ट बघितले आणि सोडलं. मग आम्ही त्यालाच सरळ विचारलं की आम्हाला टोल नसलेला रस्ता हवा आहे. त्यानेही आम्हाला रस्ता दाखवला.

झोरा आणि एल्विरचं घर शोधताना आमच्या नाकीनऊ आल्या. रात्री जवळजवळ १२ वाजता त्या छोट्या खेड्यात कोण दिसणार. पण एका माणसाने आमची अवस्था बघितली आणि त्याने आमच्या गाडीत बसून रस्ता दाखवायची तयारी दाखवली. त्याने आम्हाला पत्त्यावर सोडलं आणि तो निघून गेला. झोरा आणि एल्विरविषयी तर लिहिलच आहे.

नंतर, आम्ही लौटरब्रूनेनहून(Lauterbrunnen) परत येताना ब्रुनेनला जाताना आमची तिथली होस्ट, मायाला फोन करायचा होता. अर्थातच आमच्याकडे फोन नव्हता. म्हणजे फोन होता पण कार्ड नव्हतं. म्हणून वाटेत एका छोट्या रेल्वे स्थानकांत फोन आहे का ते बघायला गेलो. तिथे फोन होता पण तो नाणी किंवा क्रेडीट कार्ड स्विकारत नव्हता. तिथल्या सूचना आणि चित्रे यांतून आम्हा पामरांना काही अर्थबोध होत नव्हता. त्याला बहुतेक प्रीपेड कार्ड हवं होतं, जे अर्थात आमच्याकडे नव्हतं. कविन परत गाडीत बसला मी भारतिय पद्धतीप्रमाणे इकडे-तिकडे फिरून कोणी दिसतंय का याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक गाडी आली, एक बुवा आणि एक बाई आत बसले होते.  बाई खाली उतरली. मी तिचीच वाट बघतोय असं तिला वाटू नये म्हणून जरा इकडे-तिकडे करून, तिला "Excuse me" म्हटलं. मी फोन कसा करू शकेन याची चौकशी केली. अर्थातच पहिला प्रयत्न निष्फळ ठरला. तिला ईंग्रजी येत होतं, पण तिला काही कळलं नाही. पुन्हा जरा वेगळया भाषेत तेच विचारलं. यावेळेला तिला समजलं, तिने माझ्याकडून नंबर घेतला आणि स्वतः फोन केला, फोन लागल्यावर माझ्याकडे दिला. उत्तम झालं. फोनही झाला आणि पैसेही वाचले. आता मदत करायची वेळ त्याच गाडीतल्या बुवाची होती. आम्ही खरं तर रस्ता विचारला नव्हता, पण त्याने गाडीतून नकाशा बाहेर काढला, गाडीच्या बॉनेटवर पसरला. आपण कुठे आहोत, ब्रुनेन कुठे आहे, कुठले exits घ्यायचे ते सांगितलं. कविनच्या फोन मधे ही आम्ही निघायच्या आधी लिहून घेतली होतीच पण बुवांचा मान राखायचा म्हणून पुन्हा एका कागदावर लिहून घेतली. "Thank you. Thank you." म्हणून आम्ही मार्गस्थ झालो.

दूसऱ्या दिवशी, माया श्विझमधील मध्ययुगीन घर वजा संग्रहालय दाखवायला घेऊन गेली. खरं म्हणजे, आम्ही गेलो त्या वेळी ते बंद असतं, पण आम्ही एकच दिवस आहोत, भारतातून आलोय म्हटल्यावर तिने आम्हाला आत सोडलं वर तिकीटसुद्धा घेतलं नाही.  आमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली.

अॉस्ट्रीयन सरंजामशाही
अॉस्ट्रीयात आम्हाला, आमच्यावर रात्री १० वाजता हॉटेल रूम घ्यायची वेळ आली. आम्ही एका जवळच्या आणि मुख्य म्हणजे आमच्या बजेटमधे बसणाऱ्या हॉटेलला फोन केला. कोणितरी फोन उचलला, कविनने सांगितलं की एका रात्रीसाठी खोली हवी आहे, पलिकडच्या माणसाने सांगितलं रूम आहे, पण आता देता येणार नाही कारण, आता "Reception" बंद झालंय. आम्ही reception desk लाच फोन केला होता. कविनने पुन्हा विचारलं, त्याने सांगितलं चेक-इनची वेळ दूपारी २ ते रात्री ९ आहे, त्यामुळे आता खोली देता येणार नाही.  आम्ही दोघेही अवाक् झालो. हा माणूस reception desk वरच होता आणि तरीही reception desk बंद आहे म्हणून तो आम्हाला एका रात्रीसाठीसुध्दा खोली द्यायला तयार नव्हता.




Saturday 14 July, 2012

CDG Protocol

CDG Protocol हे खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाचं नाव वाटेल किंवा suspense thriller चित्रपटातील काहीतरी सांकेतिक शब्द वाटेल. वस्तुत: हा प्रोटोकॉल म्हणजे मी आणि माझा मित्र पॅरीसला चार्ल्स द गॅाल (Charles de Gaulle) विमानतळावर कसं भेटायचं याचा प्रोटोकॉल होता. पॅरीसला विमानतळावर दोघांकडेही फोन नव्हते. विमानतळावर Wi-Fi 15 मिनिटेच फुकट होतं. दोघांच्या विमानांच्या पोचण्याच्या वेळात 3-4 तासांचं अंतर होतं. दोन्ही विमानं वेगवेगळ्या टर्मिनलला जाणार होती. त्यात पुन्हा विमान उशीरा पोचल तर काय करायचं. या सगळ्याचा विचार करून तास भर chat केल्यावर मित्राने ही  जबाबदारी माझ्यावर सोपवली. मग मी हापिसात जवळ-जवळ 3/4 तास खर्च करून काही पायऱ्या लिहिल्या. मी काय करायचं आणि मित्राने काय करायचं यासाठी दोन वेगवेगळे संच झाले. ते सगळं एकत्र करून जे काही स्पष्ट शब्दात लिहील. तो ड्राफ्ट म्हणजे हा CDG Protocol. आमचा विचार आहे की  तो IETF कडे प्रमाणिकरणासाठी पाठवावा (RFC 2012).


Following is a RFC for this protocol. IF it looks okay the add hotel details and to it. so that I can take printout tomorrow.
Seriously I am exhausted by this protocol writing.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
All times are local times in Paris. Set world clock in mobile for India, Paris and SF.
Kavin's Flight: AIR FRANCE AF 0085 San Francisco to Paris CDG Arrival Time in Paris (2.00pm 2nd June 2012)
Anish' Flight: SRILANKAN AIRLINES UL 172 (Bangalore - Colombo) 
                   Arrival Time in Colombo: 10.20pm 1st June 2012
SRILANKAN AIRLINES UL 563 (Colombo - Paris CDG) Arrival Time in Paris 9.40am 2nd June 2012)

1. At the meeting point if there is no space to sit. One who comes early can sit at one of the nearest public seats. Not inside any restaurant.
2. In any case before leaving airport we shall check email and drop an email to other describing how can he be reached by other person.
3. Case 1 and 2 gets precedence over all other conditions. i.e. it is possible to have all or combination of conditions 1,2,4,5.
In such a case, method for 1 or 2 shall be followed that is to go to hotel and wait there.

Case 1: If Anish's flight is not landing before 5pm. Kavin goes to the hotel. He sends an email with details of how to reach hotel. Anish meets him there. Mission accomplished Hurray!

Case 2: Kavin's flight is not landing before 3pm. Anish goes to the hotel. He sends an email with details of how to reach hotel. Anish meets him there. Mission accomplished Hurray!

Case 3: Both flights land to CDG at their respective scheduled times.

After all checks, baggage collection, Anish shall be free at around 11:30AM. He shall check the status of Kavin's flight.
He shall figure out Free shuttle/metro service to terminal 2E. He shall reach terminal 2E Arrival gate.
He shall wait for Kavin at exit of gates, there is iIIy (Italian bar/fast food joint) in the corridor.
Anish shall wait at the entrance of illy for Kavin for  2 hours from landing of Kavin's flight.
 (Check map with magnifying glass tool: http://www.aeroportsdeparis.fr/ADP/Scripts/plans-interactifs/#/UK/CDG/T2E/T2E_A/barestaurants/bar+resto)
If we did not meet there. (for reasons: Anish is not allowed to be there. or We missed.)
Part 2:
We go to RER/TGV station 2. Meet there in Sheraton lobby on second floor. If we do not meet for 3hrs 30 mins after landing of Kavin's flight. We both go to the hotel.
Kavin meets Anish. Mission accomplished Hurray!

Case 4: Anish's flight gets delayed and lands in Paris CDG before landing of Kavin's flight.
Follow Case 3 only if Case 1 and 2 are not applicable.
Case 5: Anish's flight gets delayed and lands in Paris CDG after landing of Kavin's flight and case 1 and 2 are not applicable.
After all checks, baggage collection, Kavin shall be free at 3:30pm. He shall check Anish's flight.
He shall figure out Free shuttle/metro service to terminal 1. He shall reach terminal 1 Arrival gate at Level 3.
He shall wait for Anish at exit of gates, There is HSBC bank counter near Meeting Point close to two Travelex counters.
There are multiple HSBC counters on level 1,2 etc. So Kavin shall go to Level 3
Kavin shall wait there for Anish for 2 hours from landing of Anish's flight.
 (Check map with magnifying glass tool: http://www.aeroportsdeparis.fr/ADP/Scripts/plans-interactifs/#/UK/CDG/T1/T1_A

If we did not meet there. (for reasons: Kavin is not allowed to be there. or We missed.)
Part 2:
We go to Level 0 (CDG Val)
(http://www.aeroportsdeparis.fr/ADP/Scripts/plans-interactifs/#/UK/CDG/T1/T1_CDGVAL) of terminal 1.
We wait at Cafee Ritazza near pharmacy and baby care.
 If we do not meet for 3hrs 30 mins after landing of Anish's flight. We both go to the hotel.
Kavin meets Anish. Mission accomplished Hurray!



Tuesday 3 July, 2012

काउचसर्फिंग

काउचसर्फिंगविषयी मी कधीतरी शाळा कॉलेजात असताना वाचलं होतं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नसतात असं समजून सोडून दिलं. पुढे TechCrunch वाचताना Airbnb  विषयी समजलं आणि काउचसर्फिंगशी त्याची सरळ स्पर्धा आहे हेही समजलं. आमच्या Ultra Low Budget युरोट्रीपसाठी या पर्यायांचा विचार करायला हवा असं वाटलं.
काउचसर्फिंग म्हणजे प्रवासी एका स्थानिक माणसाच्या घरी पाहुण्यासारखा रहातो. काउचसर्फिंगला काउचसर्फिंगच्या परिभाषेत CS म्हणतात, असा प्रवास करणाऱ्या माणसाला (सर्फर) Surfer म्हणतात आणि स्थानिक माणसाला होस्ट (Host) म्हणतात. couchsurfing.com हे संकेतस्थळ अशा सर्फर आणि होस्ट यांची गाठ घालून द्यायचं काम करतं. याची सुरुवात झाली 1999 साली. कॅसी फेंटन (Casey Fenton) नामक अमेरिकी विद्यार्थ्याला आईसलंडच तिकीट मिळालं. प्रवासाची सोय झाल्यावर राहायच काय करायचा असा प्रश्न आला. त्याने सरळ आईसलंडमधील विद्यापीठातील मुलांना email spam केलं. 1500 मधील 50 लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातून काउचसर्फिंग जन्माला आलं. सुरुवातीला ती नफा न कमावणारी धर्मादाय संस्था होती, पण हल्लीच 2011 मध्ये काउचसर्फिंगची नफा कमावणारी कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली.
साहजिकच, मी सुरुवातीला  साशंक होतो. अश्या राहण्यामध्ये सुरक्षेची काय हमी. एक तर परक्या देशात आणि परक्याच्या घरी, काही झालं तर? आधी असं स्वतःच्या घरी अनोळखी माणसाला  कोण राहायला देईल? दिलंच तर सोय कशी असेल? भाषा समजेल की नाही?  असे सगळे मुलभूत प्रश्न होतेच. वर पुन्हा मग फुकट राहणार तर त्यांना त्रास देणं योग्य नाही. काहीतरी फुल न फुलाची पाकळी भेटवस्तू द्यायला हवी असले उपप्रश्न पण होतेच.
 1-2 मित्रांनीसुद्धा कल्पना हसण्यावारीच नेली. त्यामुळे सुरुवातीला मत नकारात्मकच होतं.
पण तरीही फुकट ते पौष्टिक तत्त्वानुसार मी नोंदणी केली. आपला profile तयार केला. FAQs वाचले. मुलभूत आणि उपप्रश्नांची अगदी विस्तृत उत्तरं दिली होती. थोडं बरं वाटलं. नंतर त्यावरच्या गटांचा शोध लागला. बहुतेक शहरांचा आणि देशांचा स्वतःचा गट असतो. मी लगेच बंगळूरू, मुंबई आणि युरोप अशा गटांत शामिल झालो.
त्यात एक समजलं की आपल्यासारखे बरेच जण आहेत. गर्दीचा आधार ईश्वराहून मोठा असतो हेच खरं. शेंगेन विसाची माहिती आणि शंका-समाधान करायला त्याचा बराच उपयोग झाला.
एकदा विसा मिळाला आणि मग पुन्हा मुख्य प्रश्न आला. काउचसर्फिंग करावं की नाही. मी पुन्हा देशी अमेरिकी मित्राला विचारलं त्याने त्याच्या स्वभावानुसार "I am open to everything." असं  म्हणून चेंडू परतवला.
मग मी CS वर आमचं प्रवासाचं वेळापत्रक प्रकाशित केलं आणि असंच जिथे जिथे जाणार तिथल्या लोकांचे profiles बघायला सुरुवात केली.  पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांनी डोकं वर काढलं. आम्ही दोन मुलगे जाणार तर कोण मुलगी राहायला जागा देईल आम्हाला. पण सुरक्षेच्या दृष्टीने मुलगी असणं आम्हाला बरं वाटत होतं. पुन्हा पंचाईत. मग मध्यम मार्ग म्हणून विवाहित किंवा एकत्र राहणारे लोक हा पर्याय होता. असा सगळा विचार करून मी पॅरीससाठी काही विनंती (Couch Requests) पाठवल्या. मित्राने त्याच्या बाजुने काही पाठवल्या. सर्व लोकांनी काही ना काही कारणास्तव सर्व अर्ज फेटाळून लावले. आम्हाला कोच द्यायला कोणीही तयार नव्हतं, त्यामुळे काउचसर्फिंगचा प्रश्न आपोआपच मिटला.
 2/3 दिवसातच मला email आला की "Here is my couch". एका स्विस मुलीने आम्हाला स्वत:हून जागेची उपलब्धता कळवली होती. पहिल्या अपयशाने खचून(!) गेल्यावर हे मोठच यश होतं. दुसरा प्रश्न आला, मी विनंती पाठवायचो ते जरा विचार करून आपल्याला सगळं जुळेल अशा पद्धतीने, ज्यांचे profile पडताळणी झाली आहे, ज्यांचे अनेक मित्र आहेत, ज्यांच्याविषयी लोकांनी चांगले अनुभव नोंदवले आहेत अशांना. ही मुलगी स्वतःच काउचसर्फिंगला नवीन होती, आम्हीही नवे, त्यामुळे काय करावं  कळत नव्हतं. मी आपलं आता हो म्हणून टाकू, खरच वेळ आली तर काय करायचं ते मागाहून बघू, असा विचार करून तात्पुरता होकार कळवून टाकला.
"first kill" नंतर मी जरा शहाणा झालो. पॅरीस हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे तिथे बरेच पर्यटक येतात आणि त्यामुळे कोणी host मिळणं कठीण आहे हे समजलं. त्यामुळे मी पॅरीसच्या मुख्य शहरापासून थोडं दूर पण मेट्रोने जोडलेल्या ठिकाणी शोध घेतला आणि यश मिळालं. रेनाता (Renata) आणि थिबॉ (Thibault) या मंडळींनी तयारी दाखवली. पहिल्या दिवशी हॉटेलमध्ये मुक्काम करून नंतर 2 दिवस त्यांच्याकडे राहायचं असं  ठरलं. नंतर म्युनिक, स्टुटगार्ट, प्राग, लुसर्न इथेही लोकं मिळाली.

रेनाता आणि थिबॉ:
रेनाता ही मुळची हंगेरियन आणि  थिबॉच सगळं आयुष्य पॅरीस मधेच गेलेलं. त्यामुळे त्याला पॅरीसचा कोपरा न कोपरा माहिती होता. त्याने लगेच आम्हाला plan बनवून दिला. कुठल्या मेट्रोने कुठे जायचे काय बघायचं हे सगळं सांगितलं. फ्रेंच crêpe किंवा croissant कुठे चांगले असतात याचेही फंडे दिले. तसेच तो अॅपलचा पंखा असल्यामुळे त्याने लुव्रेमध्ये कसं अॅपलच दूकान आहे. ऑपेराच्या बाहेर कसा अॅपलचा झेंडा आहे हेही फंडे मिळाले. आणि त्याने आम्हाला त्याच्या घराची चावीच दिली. आम्ही दोघेही दोन मिनिटे अवाक झालो. आम्ही शेजाऱ्यांना चावी देताना विचार करतो आणि यांनी कोण कुठल्या कधी न पाहिलेल्या लोकांना सरळ घराची चावी देवून टाकली.
माझ्या सगळ्यात लक्षात राहिलं  ते म्हणजे त्याचा Yeah चा यॅऽह असा काहीसा उच्चार आणि etcetera चा बोलीभाषेतील वापर. जो आम्ही पुढे पूर्ण ट्रीपमध्ये मजा म्हणून वापरला.  दुसऱ्या रात्री रेनाता आणि थिबॉ आम्हाला बार मध्ये घेउन गेले. आणि आम्हाला शोध लागला की हे फ्रेंच थिबॉ महाशय वाईनसुद्धा पीत नाहीत. पण तिथे गप्पा छान मारता आल्या. पॅरीस, फ्रांस, हंगेरी, भारत आणि अमेरिका अशा बऱ्याच गप्पा झाल्या. रात्री शेवटची मेट्रो चुकल्यामुळे आम्हाला बस किंवा सायकल हे दोन पर्याय होते. आम्ही सायकलचा पर्याय निवडला. कुठल्याही सायकल स्टँडवरून सायकल घ्यायची आणि कुठल्याही सायकल स्टँडवर परत करायची अशी व्यवस्था. मग थिबॉ महाशयांनी आम्हाला पॅरीस फिरवलं. आयफेल टॉवर, सीन नदी, अमेरिकेतल्या स्वतंत्र्य देवीची प्रतिकृती अशा गोष्टी जाता जाता दाखवल्या. ती सायकल सफर अविस्मरणीय झाली.

झोरा आणि एल्विर:
सर्वात वाईट अनुभव ज्यांना आम्ही दिला असं आम्हाला वाटत ते म्हणजे झोरा आणि एल्विर. आम्ही लुसर्नला रात्री 8-9 वाजता पोचू अशी आमची अपेक्षा होती. अनेक कारणांचा एकत्र परिणाम असा झाला की रात्री 11 पर्यंत आम्ही स्वित्झर्लंडमध्ये लुसर्नपासून तासाभराच्या अंतरावर होतो. उशीर तर झालाच होता तेव्हा आम्ही एल्विरला फोन करून सांगायचं ठरवलं की आम्हाला खूप उशीर होतो आहे, तर आम्ही आता येत नाही आजची रात्र आम्ही कुठे तरी काढतो आणि उद्या येतो. त्या भल्या माणसाने लगेच सांगितलं की इथेच या, मी जागा आहे. शेवटी आम्ही रात्री 12:30 पर्यंत त्याच्या घरी पोचलो. त्याने पोचल्या पोचल्या आम्हाला घर दाखवलं, झोपायची जागा दाखवली आणि घराची चावी दिली. आमची माफी मागून तो झोपायला गेला. झोरा आधीच झोपली होती. दुसऱ्या दिवशी मी उठलो तर एल्विर कामावर निघून गेला होता. झोराशी भेट झाली. ती काहीतरी अभ्यास करत होती. कॅन्सर रुग्णांच्या मानसिकतेविषयी अभ्यास करत होती. तीही थोड्याच वेळात कॉलेजला निघून गेली. पूर्ण घर आमच्या ताब्यात देऊन ते दोघेही निघून गेले होते. दोन-तीन दिवसांचं जागरण झालं होतंच आणि रोज चालणं, प्रवास याने थकून गेलो होतो. पूर्ण दिवस भटकल्यावर रात्री 8:30-9 ला घरी पोचलो तर घरी कोणीच नव्हतं. मी पलंगावर पडलो आणि मला झोप लागली. एल्विर आणि झोरा कधी आले आणि काय याचा मला काही पत्ताच लागला नाही. दुसऱ्या दिवशी लवकर उठून बाहेर पडायचा असा आमचा विचार होता. आम्ही सगळं आटपून बसलो. पण घरात काहीच हालचाल दिसेना. मंडळी बाहेर गेली म्हणावं तर खोली बंद होती. आम्ही वाट पहावी असं  ठरवलं. आता नऊ वाजून गेले होते. इथे तर काहीच हालचाल दिसत नव्हती. शेवटी माझ्या मित्राने फोन करायचं ठरवलं की हे घरात आहेत कि नाही. त्याने फोन केला आणि एल्विरने उचलला. गोंधळ असा झाला की आतापर्यंत सगळं बोलणं मीच केलं होतं, त्यामुळे झोपमोड झालेल्या एल्विर महाशयांना कळेना ते कोणाशी बोलतायत. शेवटी माझ्या मित्राने कवीनने सांगितलं, "Basically, I am the guy who is staying in your house."

नंतर एल्विर  आणि झोरा बाहेर आले, आमच्या थोड्या गप्पा झाल्या. गप्पांमध्ये मी त्याला सहज विचारला कि तू काय करतोस, त्याने सांगितलं की तो प्लंबर आहे. मी दोन क्षण कळेना की काय म्हणावं. मी छान-छानच म्हटलं.

करीना: इंग्रजी आणि गणित या विषयांचे शिक्षक होण्यासाठी ती शिकत होती. आम्ही मुनिकला तिच्याकडे गेलो, त्यादिवशी युरोकपमधील जर्मनी-नेदरलंड सामना होता. त्यामुळे ती आम्हाला घेउन तिच्या मित्रांकडे गेली. तिच्या मित्राची लिविंग रूम किंवा हॉल होता त्याची एक भिंत पूर्ण पुस्तकांनी भरून गेली होती आणि दुसरी भिंत CD/DVD ने भरली होती. त्याच्या मतानुसार तो धूम्रपान करत नाही त्यामुळे वाचलेल्या पैशातून त्याने ती खोली भरली होती.
करीनाच्या घरी तिची अभ्यासाची पुस्तकं होती, त्यात गणिताचं पुस्तक होतं. उघडून बघितलं तर ते जर्मनमध्ये linear algebra च पुस्तक होतं आणि आम्हाला रेषीय बीजगणित म्हणताना सुद्धा विचित्र वाटतंय.

सेरा:
ही शाळेत शिक्षिका होती. आम्ही गेलो तेव्हा ती आणि तिचे मित्र-मैत्रिणी सिगरेट फुकट बीअर पीत बसले होते. त्यामुळे इथल्या शाळेत मुलांना नक्की काय शिकवतात असा प्रश्न मला पडला. नंतर कळलं की तिने घाना मध्ये 9 महिने स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षिकेच काम केलं होतं. अझरबैजान मधेही तिने काम केलं होतं. तिच्या बोलण्यातून विकसित देशांत किती गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि अविकसित देशात सामान्य गोष्टींसाठीसुद्धा किती श्रम करावे लागतात याची तिला पुरेपूर जाणीव होती हे समजलं. 
तिच्याच घरामध्ये खालच्या मजल्यावर स्टेफान नावाचा विमा कंपनीमध्ये काम करणारा माणूस राहत होता. त्याने ग्रँड कॅन्यन - लास वेगास - लॉस एंजेलिस अशी सफर हार्ले डेविडसन वर केली होती, आपल्या वडिलांबरोबर.

सोल्केम:
परतताना पॅरीसचा एक दिवस मुक्काम सोल्केमच्या घरी मुक्काम होता. आम्ही तिच्या घरी पोचलो आणि आम्हाला समजलं की ती काळी मुलगी आहे. अमेरिकी देशी मित्राने लगेच मला "कुछ हो गया तो? काले लोगों के एरिया मै क्राईम रेट कितना ज्यादा होता है." हे ऐकवलं.  ती एका खोलीत रहात होती. पण तरीही तिची कोणाही माणसाला फुकट राहायला जागा द्यायची तयारी होती.

काउचसर्फिंग हा संपूर्ण नवा अनुभव आम्हाला मिळाला. काही नाविन्यपूर्ण गोष्टीं ऐकायला मिळाल्या. नव्या शहरात वावरताना मदत झाली. काही अप्रसिद्ध पण वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी बघता आल्या. स्थानिक लोकांच्या आयुष्यात थोडं डोकावून बघता आलं. 

Saturday 30 June, 2012

युरोट्रीप

खरं तर गेल्या वर्षीच "EuroTrip" करायची असं आम्हा काही मित्रांचा विचार होता. पण चंद्रावर जाव असाही विचार होता. काहीच नाही तर गेला बाजार एक जगप्रदक्षिणा तरी करून टाकावी असं आम्ही ठरवलं होतं. "वचने किं दरिद्रता" च्या धरतीवर "योजने किं दरिद्रता" अशा आमच्या योजना असतात. प्रत्यक्षात मी अजून कबन पार्कातसुद्धा गेलेलो नाही.
या वर्षी सुरुवात झाली श्रीलंकेपासून. मित्राने मार्चमध्ये जायचा विचार मांडला होता, 3-4 दिवस. पण तो बारगळला. मग एका दुसऱ्या मित्राने ढासू plan केला. त्याने 10-12 लोकांना email केला आणि त्यात सार पास, Mt. Everest base camp आणि भूतान असे 3 plan दिले. खर्च आणि वेळ याविषयी काहीही लिहिलं नाही. जे व्हायचं तेच झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठे जायचं यावर एकमत झालं, पण कधी आणि कसं यावर काहीही मत झालं नाही. शेवटी कोणीही कुठेही गेलं नाही. त्यामुळे मी आपला पुन्हा जुनाच बूट काढला कि युरोपला जाऊया. अर्थात खर्च ऐकल्यावर कोणी पटकन तयार होत नव्हतं. पण एका एतद्देशीय पण अमेरिकेच्या फॉरीन मध्ये असलेल्या मित्राने idea एकदम उचलून धरली आणि माझी पंचाईत झाली. आता पर्यंत मी "योजने किं दरिद्रता" मूड मध्ये होतो, पण आता मला खरंच विचार करावा लागणार होता. शेवटी हो-नाही करता करता मनाचा हिय्या करून मी जाण्याच ठरवलं.

त्या युरोट्रीपची ही कहाणी. या वेळेला वर्णन कालानुक्रमे न करता वेगवेगळ्या पण एकमेकांशी सम्बंध असलेल्या घटना/गोष्टी/अनुभव एकत्र लिहिले आहेत. लडाखप्रमाणे याही वेळेला prime mover सुहासच आहे. त्याने सांगितल्यामुळेच आता हे लिखाण झालं आहे. त्यामुळे या लिखाणामुळे समस्त मानव जातीवर जे काही बरे वाईट परिणाम होतील त्यासाठी सुहासला जबाबदार धरण्यात यावं.

Sunday 25 March, 2012

कहानी में ट्वीस्ट

बर्‍याच दिवसांनी ब्लॉग लिखाण करतोय. ब्लॉग लिहीण्यास कारण की हल्लीच २ चित्रपट बघितले. एक म्हणजे विद्या बालन असलेला हिंदी चित्रपट "कहानी" आणि १९५७ सालचा "12 Angry Men". दोन्ही चित्रपट चांगलेच आहेत. दोन्ही कथांमध्ये कहिही साम्य नाही.
मी अनेक चित्रपट बघितले आहेत. अनेक "Non-Linear" कथा असलेले इंग्रजी आणि स्पॅनिश चित्रपट बघितले आहेत. अनेक थोडेसा खुला शेवट असलेले चित्रपट बघितले आहेत. अशाप्रकारे बरेच चित्रपट बघितल्यामुळे चित्रपटात काय असणार याचा आधीच अंदाज येतो. मग चित्रपटामध्ये अजून कहितरी हवं होतं असं वाटायला लागतं. आता कहानी हा रहस्यमय चित्रपट असल्यामुळे, त्यात काहितरी ट्वीस्ट असणार हे गृहित धरल्यावर, तो ट्वीस्ट काय असणार इतकच कथेत शिल्लक रहातं. मग अर्धा चित्रपट बघितल्यावर ट्वीस्ट काय असणार त्याचाही अंदाज येतो. मग शिल्लक रहातात बारीक-सारीक तपशील आणि थोडेसे संदर्भ. आता कहानी रहस्यपट असल्यामुळे निदान अर्धा चित्रपट बघेपर्यंत तरी कथेकडे लक्ष द्यावं लागतं.
12 Angry Men हा काही रहस्यपट नाही. हा चित्रपट म्हणजे १२ ज्युरींमधली ज्युरीरूम मधील चर्चा आहे. आरोपीला ११ विरुद्ध १ अशाप्रकारे गुन्हेगार ठरवण्यापासून सुरू झालेली चर्चा, एकमताने त्याला निर्दोष ठरवते अशी कथा. ही कथा पहिल्या १० मिनिटांमध्येच समजते. मग रहातो तो तपशील. अर्थात, १२ ज्युरीची पार्श्वभूमी, त्यांच मत आणि मतपरिवर्तन ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण कथेच्या दृष्टीने तो तपशीलाचाच भाग आहे. आता हा चित्रपट IMDB वर #6 वर असल्यामुळे,चित्रपट बघताना कथेत कहितरी ट्वीस्ट असेल असं मला वाटत होतं. त्यामुळे जो नायक आहे तोच कदचित गुन्हेगार असेल वगैरे काही तर्कही मी मनातल्या मनात मांडले होते. पण त्यातलं काहिच निघालं नाही त्या्मुळे माझा थोडा भ्रमनिरास झाला. Inception, Edge of the Heaven वगैरे चित्रपट बघितल्यामुळे काहितरी खुला शेवट असेल, असही वाटलं होतं. पण तसही काही झालं नाही.

एकंदरीत सरळ चित्रपट आता मला फारच सरळ वाटायला लागले आहेत आणि रहस्यप्रधान चित्रपटांमध्ये क्लिष्ट गुंतागंतीची कथा आवश्यक झाली आहे.

12 Angry Men च "एक रूका हुआ फ़ैसला" असं हिंदीत रूपांतरही झालं आहे. भारतात ज्युरी पद्धती बंद झाली याचं मला फ़ार दू:ख झालं. ज्युरींमध्ये निवड झाली असती तर न्यायालयाच काम बघायला मिळालं असतं आणि ते पण वर भत्ता घेऊन. त्यानिमित्ताने भारतातील ज्युरी पद्धतीबद्दल शोध घेताना, K. M. Nanavati vs. State of Maharashtra ही रंजक माहिती मिळाली. त्या ऐतिहासिक खटल्यापसून भारतात ज्युरी पद्धती बंद करण्यात आली आणि ज्युरी बनण्याची आपली संधी कायमची गेली.