अनिल अवचटांचा माणसं नावाचा एक लेख संग्रह आहे. त्यांची क्षमा मागून.
बोहनी
श्रीलंकन एअरलाईन्सचं विमान पॅरिसला पोचलं आणि CDG Protocol प्रमाणे, मला सागळं आवरून टर्मिनल १ वरून २-ई ला जायचं होत. सीमा-पोलिस, immigration ला तिथे border-police असा शब्द अाहे, कस्टमनंतर, मी बॅग घ्यायला गेलो. तिथे नेहमीप्रमाणे बॅगा पट्टयावर फिरत होत्या आणि नविन बॅगा येत होत्या. लोकं आपआपल्या बॅगा घेत होते. थोड्या वेळाने नविन बॅगा येणं थांबलं, १-२ बॅगा अजून पट्टयावर फिरत होत्या. २०-२५ लोकं अजून बॅगा यायची वाट बघत होती, अस्मादिकही त्यामधलेच एक. आणि मग ई-फलकावर संदेश आला, श्रीलंकन एअरलाईन्सचं आवरलंय आता थाई एअरचं सामान येईल. मी मनात म्हटलं, बोहनी तर छान झाली. बॅग हरवणं, ते पण जाताना पहिल्याच दिवशी आणि पॅरिसला. त्या २०-२५ जणांमध्ये, ७-८ गोरे, ३-४ काळे आणि बाकी सावळे. पुन्हा एकदा गर्दीच्या आधाराची मला जाणीव झाली. एका जरा वयस्कर गोऱ्या बाईने तिथल्या अधिकाऱ्याला काहितरी विचारलं, त्याने काहितरी उत्तर दिलं. मी सवयीप्रमाणे ते फ्रेंच संभाषण ऐकायचा प्रयत्न केला, तो निष्फळ ठरला. मग एक बहुतेक, भारतिय किंवा श्रीलंकन सेवानिवृत्त शासकिय अधिकारी, पुढे आले. त्यांनी एकदम शुद्ध ईंग्रजीमधे अधिकाऱ्याशी बोलणं केलं. त्यातून समजलं की, की कोणालाही इथे काहिही माहिती नाही. फक्त इतकी लोकं आहेत म्हणजे काहितरी गोंधळ आहे, असं त्या फ्रेंच अधिकाऱ्याला वाटतयं. मग त्या अधिकाऱ्याने १५-२० मिनिटे फोनाफोनी केल्यवर, सामान पॅरिसला आलयं, त्या ट्रॉलीमधला एक डब्बा उघडायचा राहिला, आता तो उघडलाय, सामान येईल, हे समजलं. भले शाब्बास!
त्या प्रमाणे १०-१५ मिनीटांमध्ये बॅग आली. मग मी CDG Protocol ची प्रत बाहेर काढली आणि निघालो.
गूगलकन्या
मी CDG Protocol नुसार, टर्मिनल १ वरून २-ई ला जायची शटल शोधत होतो. तेव्हा एका मुलीने माझं लक्ष वेधून घेतलं. ती भारतिय लोकांमध्ये चिंकी आणि अमेरिकी लोकांमध्ये एशियन प्रकारांत मोडत होती. पण तिने गूगलचा टी-शर्ट घातला होता. तेव्हा वंशवादी शब्द वापरण्यापेक्षा, मी तिला गूगलकन्या म्हणतो.
मी आणि ती, म्हणजे वेगवेगळे, टर्मिनल १च्या शटलच्या फलाटाकडे जाणाऱ्या दरवाजापाशी आलो. दरवाजातून आलेल्या शटलमधील माणसं टर्मिनल १ ला येत होती. त्या माणसांमधून एक मुलगा घाईघाईने आला आणि त्याने गूगलकन्येला मिठी मारली. अर्थातच तो तिचा भाऊ असणार याविषयी, माझ्या मनात शंका नाही. मग तिने तक्रारीच्या सूरांत, ईतका ऊशीर का झाला ते विचारलं. त्याने, "I grossly underestimated the shuttle time." यावर गूगलकन्येने, "How could you?" असा प्रश्न केला. गूगलचा टी-शर्ट घातला म्हणून बिनडोक प्रश्न विचारू नयेत असं थोडंच!
CDG Protocolच महत्त्व लगेच मला जाणवलं.
स्विस माणसं
फ्रांस, स्वित्झर्लंड, अॉस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, जर्मनी या पाचही देशांमध्ये स्विस लोकं आम्हाला सर्वात जास्त आवडली. सगळी स्विस मंडळी मदतीला एकदम तत्पर. स्वत: थोडा त्रास सहन करूनसुद्धा ते तुम्हाला मदत करतात.
सुरूवातच आमची पोलिसापासून झाली. गाडी फ्रांसची हद्द ओलांडून, आधी जर्मनीत नंतर स्वित्झर्लंडमध्ये शिरली.
आतापर्यंत कविनने टोल नसणारा रस्ता शोधला होता. पण स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश करताच पोलिस चेकपोस्ट लागलं. स्वित्झर्लंड शेंगेन करारामध्ये सहभागी आहे, पण युरोझोन आणि युरोपियन युनियनमध्ये सहभागी नाही. त्यामुळे बहुतेक थोडी तपासणी करत असावेत. पोलिसाने प्रथम पासपोर्ट बघितले आणि सोडलं. मग आम्ही त्यालाच सरळ विचारलं की आम्हाला टोल नसलेला रस्ता हवा आहे. त्यानेही आम्हाला रस्ता दाखवला.
झोरा आणि एल्विरचं घर शोधताना आमच्या नाकीनऊ आल्या. रात्री जवळजवळ १२ वाजता त्या छोट्या खेड्यात कोण दिसणार. पण एका माणसाने आमची अवस्था बघितली आणि त्याने आमच्या गाडीत बसून रस्ता दाखवायची तयारी दाखवली. त्याने आम्हाला पत्त्यावर सोडलं आणि तो निघून गेला. झोरा आणि एल्विरविषयी तर लिहिलच आहे.
नंतर, आम्ही लौटरब्रूनेनहून(Lauterbrunnen) परत येताना ब्रुनेनला जाताना आमची तिथली होस्ट, मायाला फोन करायचा होता. अर्थातच आमच्याकडे फोन नव्हता. म्हणजे फोन होता पण कार्ड नव्हतं. म्हणून वाटेत एका छोट्या रेल्वे स्थानकांत फोन आहे का ते बघायला गेलो. तिथे फोन होता पण तो नाणी किंवा क्रेडीट कार्ड स्विकारत नव्हता. तिथल्या सूचना आणि चित्रे यांतून आम्हा पामरांना काही अर्थबोध होत नव्हता. त्याला बहुतेक प्रीपेड कार्ड हवं होतं, जे अर्थात आमच्याकडे नव्हतं. कविन परत गाडीत बसला मी भारतिय पद्धतीप्रमाणे इकडे-तिकडे फिरून कोणी दिसतंय का याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक गाडी आली, एक बुवा आणि एक बाई आत बसले होते. बाई खाली उतरली. मी तिचीच वाट बघतोय असं तिला वाटू नये म्हणून जरा इकडे-तिकडे करून, तिला "Excuse me" म्हटलं. मी फोन कसा करू शकेन याची चौकशी केली. अर्थातच पहिला प्रयत्न निष्फळ ठरला. तिला ईंग्रजी येत होतं, पण तिला काही कळलं नाही. पुन्हा जरा वेगळया भाषेत तेच विचारलं. यावेळेला तिला समजलं, तिने माझ्याकडून नंबर घेतला आणि स्वतः फोन केला, फोन लागल्यावर माझ्याकडे दिला. उत्तम झालं. फोनही झाला आणि पैसेही वाचले. आता मदत करायची वेळ त्याच गाडीतल्या बुवाची होती. आम्ही खरं तर रस्ता विचारला नव्हता, पण त्याने गाडीतून नकाशा बाहेर काढला, गाडीच्या बॉनेटवर पसरला. आपण कुठे आहोत, ब्रुनेन कुठे आहे, कुठले exits घ्यायचे ते सांगितलं. कविनच्या फोन मधे ही आम्ही निघायच्या आधी लिहून घेतली होतीच पण बुवांचा मान राखायचा म्हणून पुन्हा एका कागदावर लिहून घेतली. "Thank you. Thank you." म्हणून आम्ही मार्गस्थ झालो.
दूसऱ्या दिवशी, माया श्विझमधील मध्ययुगीन घर वजा संग्रहालय दाखवायला घेऊन गेली. खरं म्हणजे, आम्ही गेलो त्या वेळी ते बंद असतं, पण आम्ही एकच दिवस आहोत, भारतातून आलोय म्हटल्यावर तिने आम्हाला आत सोडलं वर तिकीटसुद्धा घेतलं नाही. आमच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली.
अॉस्ट्रीयन सरंजामशाही
अॉस्ट्रीयात आम्हाला, आमच्यावर रात्री १० वाजता हॉटेल रूम घ्यायची वेळ आली. आम्ही एका जवळच्या आणि मुख्य म्हणजे आमच्या बजेटमधे बसणाऱ्या हॉटेलला फोन केला. कोणितरी फोन उचलला, कविनने सांगितलं की एका रात्रीसाठी खोली हवी आहे, पलिकडच्या माणसाने सांगितलं रूम आहे, पण आता देता येणार नाही कारण, आता "Reception" बंद झालंय. आम्ही reception desk लाच फोन केला होता. कविनने पुन्हा विचारलं, त्याने सांगितलं चेक-इनची वेळ दूपारी २ ते रात्री ९ आहे, त्यामुळे आता खोली देता येणार नाही. आम्ही दोघेही अवाक् झालो. हा माणूस reception desk वरच होता आणि तरीही reception desk बंद आहे म्हणून तो आम्हाला एका रात्रीसाठीसुध्दा खोली द्यायला तयार नव्हता.