Saturday, 30 June, 2012

युरोट्रीप

खरं तर गेल्या वर्षीच "EuroTrip" करायची असं आम्हा काही मित्रांचा विचार होता. पण चंद्रावर जाव असाही विचार होता. काहीच नाही तर गेला बाजार एक जगप्रदक्षिणा तरी करून टाकावी असं आम्ही ठरवलं होतं. "वचने किं दरिद्रता" च्या धरतीवर "योजने किं दरिद्रता" अशा आमच्या योजना असतात. प्रत्यक्षात मी अजून कबन पार्कातसुद्धा गेलेलो नाही.
या वर्षी सुरुवात झाली श्रीलंकेपासून. मित्राने मार्चमध्ये जायचा विचार मांडला होता, 3-4 दिवस. पण तो बारगळला. मग एका दुसऱ्या मित्राने ढासू plan केला. त्याने 10-12 लोकांना email केला आणि त्यात सार पास, Mt. Everest base camp आणि भूतान असे 3 plan दिले. खर्च आणि वेळ याविषयी काहीही लिहिलं नाही. जे व्हायचं तेच झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठे जायचं यावर एकमत झालं, पण कधी आणि कसं यावर काहीही मत झालं नाही. शेवटी कोणीही कुठेही गेलं नाही. त्यामुळे मी आपला पुन्हा जुनाच बूट काढला कि युरोपला जाऊया. अर्थात खर्च ऐकल्यावर कोणी पटकन तयार होत नव्हतं. पण एका एतद्देशीय पण अमेरिकेच्या फॉरीन मध्ये असलेल्या मित्राने idea एकदम उचलून धरली आणि माझी पंचाईत झाली. आता पर्यंत मी "योजने किं दरिद्रता" मूड मध्ये होतो, पण आता मला खरंच विचार करावा लागणार होता. शेवटी हो-नाही करता करता मनाचा हिय्या करून मी जाण्याच ठरवलं.

त्या युरोट्रीपची ही कहाणी. या वेळेला वर्णन कालानुक्रमे न करता वेगवेगळ्या पण एकमेकांशी सम्बंध असलेल्या घटना/गोष्टी/अनुभव एकत्र लिहिले आहेत. लडाखप्रमाणे याही वेळेला prime mover सुहासच आहे. त्याने सांगितल्यामुळेच आता हे लिखाण झालं आहे. त्यामुळे या लिखाणामुळे समस्त मानव जातीवर जे काही बरे वाईट परिणाम होतील त्यासाठी सुहासला जबाबदार धरण्यात यावं.

No comments:

Post a Comment