घाबरू नका! हा काही चित्रपट नाहिये. तसे मी गेल्या आठवड्यात Up in the Air आणि You don't Mess with Zohan हे चित्रपट बघितले. You don't Mess with Zohan म्हणजे आचरट कॉमेडी आहे. Up in the Air चांगला आहे. पण लिहावं असं काही वाटलं नाही. एक तर नुसतं लिहीणंच सोपं नाही त्यात चित्रपटांविषयी लिहिणं अजून कठीण आहे असं वाटतंय.
ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती तेव्हा चित्रपट नाही तर सॉफ़्टवेअर तंत्रज्ञान यावर लिहिता येईल असं वाटलं होतं. त्यामुळे चित्रपट लिखाणाचं आवरल्यावर आता सॉफ़्टवेअरमध्ये काही जमतंय का हे बघूया असा विचार केला.
Cowsay किंवा Cowthink असे दोन सॉफ़्टवेअर प्रोग्रॅम आहेत. मुळात दोन्हीही प्रोग्रॅम एकच आहेत पण दोन वेगळी नावे आहेत. Fortune हा आणखी एक प्रोग्रॅम आहे. Fortune त्याच्या फाईलमधून प्रत्येकवेळी एक नविन वाक्य/विचार काढतो.
हे वाक्य Cowthink ला दिलं की विचार करणारी गाय तो प्रोग्रॅम तयार करतो. मी PHP वापरून फक्त हे दोन प्रोग्रॅम एकत्र केले आहेत आणि या पानावर दाखवले आहेत. Cowthink/say मुळामध्ये Perl मधे लिहिला आहे तो जर पूर्णपणे PHP मधे लिहिला तर त्याची कार्यक्षमता वाढेल आणि आंतरजालावर वापरायला सुटसुटीत होईल. तो प्रकल्प पुन्हा केव्हातरी.
आता या गाईच्या अनेक छटा आहेत. कधी दमलेली, कधी उत्साही, कधी मेलेली (बिचारी गाय!). सध्या ती stoned आहे. ;-) या पानाच्या उजव्या कोपर्यात विचारी गाय आहे. ती दिसत नसेल तर एवढं सगळं लिहिलेलं व्यर्थ आहे. आणि मी जादूगार पी सी सरकारसारख्या वस्तू पक्षी म्हणजे इथे गाय गायब करू शकतो हे सिद्ध होईल.
आता त्या गाईमुळे आणि तिच्या विचारांमुळे जर तुमच्या भावना दुखावत असतील तुम्हीही stoned व्हा!
तो PHP प्रोग्रॅम इतका लहान आहे की तो मुक्त उपलब्ध करण्याचा काही उपयोग नाहिये. तुम्हाला अशी गाय हवी असेल तर सांगा. आमचे येथे सर्व प्रकारच्या गाई मोफ़त बनवून मिळतील!
टीप: काही अपरिहार्य कारणांमुळे विचारी गाय सध्या विचार करत नाही आहे. पण शक्य तितक्या लवकर तिला पुन्हा विचार करण्यास प्रवृत्त करण्यात येईल.
No comments:
Post a Comment